अनैतिक संबंधात अडसर ठरला प्रियकराचा बाप; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

या महिलेवर यापूर्वीच स्वतःच्या नवऱ्याचा खून केल्याचा आरोप असून सध्या ती जामिनावर बाहेर होती.
Buldhana Police Station
Buldhana Police StationSaam Tv

बुलढाणा - अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आरोपी महिलेने मित्राच्या मदतीने आपल्याच प्रियकराच्या बापाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुलडाणा शहरात काल सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) खून करण्याऱ्या आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या मित्राला देखील अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महिलेवर यापूर्वीच स्वतःच्या नवऱ्याचा खून केल्याचा आरोप असून सध्या ती जामिनावर बाहेर होती.

बुलडाणा (Buldhana) शहरातील पुरभे ले -आऊट परिसरात काल दिनेश आराख हे गंभीर जखमी अवस्थेत सापडले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस तपासात दिनेश आराख यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी तपास करीत या खुनाचे गुढ उकलले.

हे देखील पाहा -

मृतक दिनेशला दोन मुले असून यातील २३ वर्षीय निलेश आराख या मुलाचे गायरान परिसरातील विधवा महिलाशी दोन महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती मृतक दिनेश आराख यांना कळल्याने माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद करू नको , अशी समज त्यांनी त्या महिलेला दिली होती. यावेळी दिनेश आराख यांचे महिलेसोबत भांडण ही झाले होते. त्यामुळे दिनेश आराख बद्दल महिलेच्या मनात प्रचंड राग होता.

Buldhana Police Station
Mumbai Rain : मुंबईत पुढील ३-४ तास मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहणार

एव्हढे होऊनही महिला आणि निलेश यांच्यात अनैतिक संबंध सुरूच होते. दरम्यान अनैतिक संबंधात निलेशचे वडील अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढायचा हा विचार आरोपी महिलेच्या मनात होता. तिने याबद्दल तिचा मित्र सागर मगर याला सोबत घेतले आणि खुनाचा कट रचला. काल संध्याकाळी आरोपी सागरने दिनेश आराख यांना भरपूर दारू पाजली आणि दगडाने ठेचून त्यांचा खूप केला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि गोपनीय तपासाच्या आधारे वेगवान तपास करून या खुनाचा छडा लावून आरोपी सागर आणि आरोपी महिलेला अटक केली आहे. तर बुलडाणा शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेवर तिच्या पतीच्या खुनाचा आरोप असून ती सध्या जामिनावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com