Buldhana: शिक्षक की भक्षक ? जिल्ह्यात विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराची तिसरी घटना

जिल्हा परिषदेच्या शाळेत खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam tv

बुलढाणा: गुरूला वंदन करण्यासाठी ५ सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षकांचा या दिवशी आपण मोठा मान सन्मान देऊन गौरव करतो. पण बुलढाण्यातील (Buldhana) नांदुरा तालुक्यातील मुरंबा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत (ZP School) खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आपल्या केबिनमध्ये बोलावून मला तुझा अभ्यास चेक करायचा आहे.

म्हणून जवळ बोलावून नंतर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ऐन शिक्षक दिनीच घडल्याने आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मुरुंबा हे छोटस गाव गावात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेवर दोन शिक्षक (Teacher) असून एक शिक्षक अकोला येथून ये-जा करतात व दुसरे मुख्याध्यापक देविदास दिघोळे हे शेगाव येथून ये-जा करतात.

पाहा व्हिडीओ -

शिक्षकदिनी दुसरे शिक्षक शाळेवर आले नसल्याच पाहून आरोपी मुख्याध्यापक देविदास दिघोळे याने पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीला आपल्या केबिनमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला. कुणालाही सांगू नको अशी धमकीही दिली.

मात्र, मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगाव राजा पोलीस (Police) स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे. यावरून पोलिसांनी तात्काळ भा.द. वि.३५४ व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी मुख्याध्यापक कालपासून फरार होता आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Buldhana Crime News
Accident: भरधाव आयशर ट्रकची कालीपिलीला धडक; सहा प्रवाशी जखमी

बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांकडून आपल्याच विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या एकाच महिन्यात तीन घटना समोर आल्याने आता मात्र शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये व समाजात शिक्षकांप्रति जनभावना उफाळून येत आहेत व आपल्या चिमुरड्या ना शाळेत पाठवायला भीती वाटत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com