Buldhana : जिल्ह्याची आरोग्यसेवा वाऱ्यावर; महिलेची रिक्षातच प्रसूती!

रुग्णालयात कर्तव्यावर एकही डॉक्टर नसल्याने जवळपास ५० मिनिटे या महिलेला ऑटो रिक्षात वेदना सहन कराव्या लागल्या.
Buldhana : जिल्ह्याची आरोग्यसेवा वाऱ्यावर; महिलेची रिक्षातच प्रसूती!
Buldhana : जिल्ह्याची आरोग्यसेवा वाऱ्यावर; महिलेची रिक्षातच प्रसूती!संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून "आरोग्य सेवा हीच ईश्र्वर सेवा" हे ब्रीद वाक्य संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात धुळ खात आहे. अश्यातच आज रात्री ८.३० च्या सुमारास एक महिलेला प्रसूतीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात तिच्या परिवाराने आणले होते.

हे देखील पहा :

तेव्हा रुग्णालयात कर्तव्यावर एकही डॉक्टर नसल्याने जवळपास ५० मिनिटे या महिलेला ऑटो रिक्षात वेदना सहन कराव्या लागल्या. शेवटी जवळच असलेल्या निवासस्थानातून एक परिचारिका आल्यावर तिने इथे डॉक्टर नसल्याने तुम्ही तुमच्या रुग्णाला शेगाव येथील रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिला. पण, महिलेला जास्त वेदना होत असल्याने शेवटी ती महिला ऑटोरिक्षात प्रसूत झाली.

Buldhana : जिल्ह्याची आरोग्यसेवा वाऱ्यावर; महिलेची रिक्षातच प्रसूती!
Breaking : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक? किरीट सोमय्यांचं ट्विट!

आज सकाळ पासून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नसल्यामुळे तालुक्यातील काकणवाडा, कोलद व इतर गावातील गर्भवती महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रुग्णालयात मागील 8 वर्षापासून एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाही हे विशेष.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.