महंमद पैगंबरांविषयी बेताल वक्तव्य; बुलढाणा बंदला प्रतिसाद

जोपर्यंत दोषींवर कारवाई केल्या जात नाही तोपर्यंत टप्या टप्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे
buldhana city shops closed on friday to support raja academy
buldhana city shops closed on friday to support raja academy

बुलढाणा : त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधवावर सातत्याने अत्याचार केले जात आहे. मस्जिदमध्ये तोडफोड केल्या जात आहेत. याबराेबरच मुस्लिमधर्म संस्थापक महंमद पैगंबर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) बुलढाणा जिल्हा बंदचे आवाहन रजा अकादमीच्या वतीने करण्यात आले होते. त्यास बुलढाणावासियांनी उत्तम प्रतिसाद दिला. buldhana city shops closed on friday to support raja academy

buldhana city shops closed on friday to support raja academy
एकात्मतेवरील 'हम हिंदुस्तानी' गाणे रिलीज; नेटीझन्सच्या उड्या

बुलढाणा शहरासह जिल्ह्यात व्यापा-यांनी स्वयंस्फुर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. बुलढाणा, खामगाव, चिखली, शेगाव मलकापूरसह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. नागरिकांची देखील या बंद काळात प्रमुख रस्त्यांवर वर्दळ कमी आहे.

त्रिपुरा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रजा अकादमीच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत टप्या टप्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी महत्वाच्या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com