Buldhana: भीक मागणाऱ्यांकडून सुटका झालेला 'तो' चिमुकला देउळगावमहीचा!

सदर अमानवीय घटनेतील पीडित चिमुकला बुलढाण्यातील देऊळगाव मही येथील असल्याचे वायरल झालेल्या व्हिडिओ द्वारे उघडकीस आले आहे.
Buldhana: भीक मागणाऱ्यांकडून सुटका झालेला 'तो' चिमुकला देउळगावमहीचा!
Buldhana: भीक मागणाऱ्यांकडून सुटका झालेला 'तो' चिमुकला देउळगावमहीचा!Saam Tv

संजय जाधव

बुलढाणा: औरंगाबादमध्ये Aurangabad महामार्गावरील सिग्नलवर भीक मागण्यासाठी विकत घेतलेल्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या महिलांना औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. सदर अमानवीय घटनेतील पीडित चिमुकला बुलढाण्यातील Buldhana देऊळगाव मही येथील असल्याचे वायरल झालेल्या व्हिडिओ द्वारे उघडकीस आले आहे. देऊळगावमही येथील पगारे कुटुंबातील दोन मुले दीड लाखात विकल्या गेल्याची अमानवीय बाब समोर आली आहे.

हे देखील पहा-

तालुक्यातील देऊळगाव मही येथील पगारे कुटुंबातील दोन मुले दीड लाखात विकण्यात आले होते. त्यातील एक मुलगा सहा वर्षाचा तर दुसरा दोन वर्षाचा चिमुकला आहे. औरंगाबाद येथील रामनगर स्थित एका घरात डांबून दोन महिला चिमुकल्यांना अमानुषपणे मारहाण करीत होते.

सदर बाब शेजारी असलेल्या एका महिलेने एका सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमाने पोलिसांपर्यंत पोचविली अन् मानवतेचा भयावह चेहरा समोर आला. मुकुंदवाडी (औरंगाबाद) येथील पोलिसांनी महिलांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखविल्याअसता दोन्ही मुलांना दत्तक घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Buldhana: भीक मागणाऱ्यांकडून सुटका झालेला 'तो' चिमुकला देउळगावमहीचा!
Sidharth Shukla Death: सिद्धार्थनं शेहनाझच्या मांडीवर सोडला जीव?

मात्र पीडित सहा वर्षीय सतीश याने रामनगर येथील नागरिकांसमोर क्रूरतेची हकीकत सांगताना अंगाला शहारे येतात, वायरल झालेल्या सदर व्हिडिओत तो देऊळगाव मही येथील सतीश पगारे सांगतो, आईचे नाव पूजा व वडिलांचे नाव विसराम पगारे असे सांगत असून आजी-आजोबा अकोला येथे राहतात तर वडील राजस्थान येथे असल्याचे सांगतो.

नागरिकांनी विचारल्यानंतर भीक मागण्यासाठी आम्हाला एक म्हातारी व एक महिला अमानुषपणे मारहाण करीत असल्याचे तो सांगतो. ही धक्कादायक बाब समोर आली असून पोलिसांनी त्या महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

Buldhana: भीक मागणाऱ्यांकडून सुटका झालेला 'तो' चिमुकला देउळगावमहीचा!
धक्कादायक! आनंदात तालिबान्यांचा गोळीबार; लहान मुलांसह अनेक लोक ठार

100 रुपयांच्या बॉंड पेपरवर चिमुकल्यांचा करार!

सदर महिला औरंगाबाद महामार्गावरील सिग्नलवर भीक मागतात तर या चिमुकल्यांना भीक मागण्यासाठी शंभर रुपयांच्या बाँडवर करार करून त्यांनी विकत घेतल्याचे उघडकीस आले होते. सदर व्हिडिओत निरागस चेहरा असलेल्या त्या चिमुकल्या ने सांगितले की, भीक मागितली नाही तर तुम्हाला मारून टाकू व कोरोना मध्ये तुमची मुले मेल्याचे तुझ्या आई वडिलांना सांगू अशी भीती दाखविल्या जात होती दरम्यान औरंगाबाद पोलिसांकडून अद्याप देऊळगावराजा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला नाही. मात्र मानवतेचा क्रूर चेहरा दर्शविणारा सदर व्हिडिओ आणि त्या व्हिडीओत  बोलत असताना तो निरागस चिमुकल्याची कथा अंगावर शहारे आणणारी ठरत असून सदर व्हिडिओ पाहून मानवतेला पाझर फुटला आहे

तर आज सकाळी औरंगाबाद पोलिसांनी देउलगावमही येथील एका महिलेला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com