'तुम्ही हल्ले केले तर, माझ्या गाडीत पण सगळ्या गोष्टी तयार असतात'; शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य

'तुम्ही जाहीर पणे सांगता की कुणी कार्यकर्त्याने आमदारांची गाडी फोडली तर आम्ही मातोश्री वर त्याच स्वागत करू'
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV

बुलढाणा: सत्तेत आले म्हणून दादागिरी करता का असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारमधील आमदारांवरती निशाणा साधला होता. याच अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बुलढान्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

'महाराष्ट्रात तुम्ही आमदारांच्या गाड्यांवर हल्ले करता , त्यांच्या घरावर हल्ले करता. त्यांच्या परिवारावर हल्ले करता, मग काय आता स्वतःच्या परिवाराच्या रक्षणासाठी स्वतःची टीम तयार ठेऊ नये? आत्मरक्षण करणे हा काय गुन्हा आहे? आमदारांनी मार खावा का? आणि आता मी पण जाहीर पणे सांगतो की, समजा कोणी अशा प्रकारे वागणूक करत असेल तर मी पण तयार आहे.

माझ्या गाडीत पण सगळ्या गोष्टी तयार असतात , माझी पण फौझ तयार असते. तुम्ही जर अशा प्रकारे हल्ला करणार नाहीत तर प्रतिउत्तर येईल कशाला' असं गायकवाड म्हणाले. तुम्ही एक्शन करू नका आम्ही इकडून रिऍक्शन करणार नाही. तुम्ही जाहीर पणे सांगता की कुणी कार्यकर्त्याने आमदारांची गाडी फोडली तर आम्ही मातोश्री वर त्याच स्वागत करू, ही भाषा वापरत असला तर आमदारांनी काय तयारीत राहणं काय चुकीचं आहे? का असा सवाल त्यांनी उपस्थित करत अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं.

आज ,काळी माध्यमांशी बोलताना शिंदे सरकार हे गद्दारांच सरकार असल्याची टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता बुलढान्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गायकवाड म्हणाले, 'हे सरकार जनतेने भाजपा-शिवसेना युतीचं सरकार म्हणूनच निवडून दिलेलं आहे.

हे बेइमानीच सरकार नाही तर बेईमानी आम्ही भाजपशी केली होती. बेईमानी आमच्या लोकांनी भाजपशी केली होती. आता हे नैसर्गिक युतीच सरकार आलं आहे. हे इमानदारीचे सरकार असून आता बेईमानी लोकं बाजूला फेकली गेली असल्याचं ते म्हणाले.

Ajit Pawar Eknath Shinde
'पन्नास खोके, एकदम ओके'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा

तर सध्याचे खातेपाटप हे रुटीनचे खातेवाटप आहे, मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत , आणि जे काही लोक बाहेर बोलताहेत की आता मंत्रिमंडळात विस्तार होत आर नाही तर एक केबिनेट खात्याला एक राज्यमंत्री द्यावाच लागतो. सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले आहे आणि तो होणारच आहे. उर्वरित जे काही आमदार आहेत ज्यांना मंत्रीपदाची इच्छा आहे त्यांना सर्वांना देण्यात येणारच असल्याचं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com