एसटी कर्मचारी आंदोलन; बुलडाणा जिल्ह्यास साडेसहा कोटींचा फटका

एसटी कर्मचारी संपामुळे लालपरीवर विश्वास ठेवून बिनधास्त प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची दाणादाण उडाली.
एसटी कर्मचारी आंदोलन; बुलडाणा जिल्ह्यास साडेसहा कोटींचा फटका
msrtc employee strike buldhana

बुलढाणा : प्रारंभी वेतनवाढ व अन्य पूरक मागण्या आणि नंतर आंदोलनाचे राजकीयकरण किंबहुना हे आंदोलन काहीसे हायजॅक झाल्यावर राज्य शासनात महामंडळाचे विलिनीकरण करा या मागणीसाठी आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. न्यायालय, राज्य शासन, अभ्यास समिती असा या आंदोलनाचा विस्तार आहे. यामुळे हे आंदोलन, वादळात दिशा हरवलेल्या जहाजासारखे झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा (buldhana) विभागाची यामुळे वाताहत झाली. आधीच दीर्घकालीन लॉकडाऊन व कोरोनामुळे भयंकर तोट्यात असलेल्या बुलडाणा विभागाला आत्ता संपामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियी बेहाल होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. लालपरीवर विश्वास ठेवून बिनधास्त प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची दाणादाण उडाली. त्यांना खासगी वाहन धारकांच्या राजरोस मनमानीला तोंड द्यावे लागले व लागत आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास दररोजचे ७ डेपोंच्या ४०० शेड्युलद्वारे रोज सरासरी ७० ते ८० हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येते.

msrtc employee strike buldhana
शिवीगाळ, बघून घेण्याची भाषा; DCC च्या मतदान प्रक्रियेत तणाव

दिवाळीसारख्या महिनाभर चालणाऱ्या मोठ्या सिजनमध्ये दैनिक उत्पन्न ५० लाखांपर्यत जाते. सात ते २० नोव्हेंबर दरम्यानचे १३ दिवसात हा आकडा सहा कोटी ५० लाखां पर्यंत जातो. यादरम्यान तब्बल ७५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आणि बरेच काही नुकसान झाले आहे.

आता आंदोलन कोणत्या दिशेला जाते व कधी एकदाचा निर्णय होतो याकडे एसटी कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे. एसटीच्या आंदोलनावर तोडगा निघून कर्मचारी व प्रवाशांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com