Buldhana Accident News: नवसासाठी जाणाऱ्या भाविकांच्‍या वाहनाचा अपघात; २० भाविक जखमी

नवसासाठी येणाऱ्या भाविकांच्‍या गाडीचा अपघात; २० भाविक जखमी
Buldhana Accident News
Buldhana Accident NewsSaam tv

बुलढाणा : सैलानी बाबांच्‍या दरगाहवर नवस फेडण्यासाठी येत असलेल्‍या भाविकांचे वाहन पलती होवून अपघात (Accident) झाला. यात मेटॅडोअरमधील २० भाविक जखमी झाले आहेत. जखमींना (buldhana) तात्‍काळ रुग्णालयात दाखल केले आहे. (Breaking Marathi News)

Buldhana Accident News
Ambegaon News: कपडे धुताना नदीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्‍यू; आईने रोखल्‍याने तिसरी वाचली

हिंदू– मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सैलानी बाबांच्या दरगाहवर नवसासाठी येणाऱ्या भाविकांच्या मेटॅडोअर वाहनाचा बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी जवळच्या वळणावर अपघात झाला. चालकाकडून वाहन अनियंत्रीत झाल्‍याने सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वाहन पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात जवळपास २० भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Buldhana Accident News
Jalgaon Bank Robbery: जळगावातील थरार..भरदिवसा स्‍टेट बँकेवर दरोडा; १५ लाखाहून अधिक रक्‍कम घेवून चोरटे फरार

महिला व बालकांचा समोवश

जालना जिल्ह्यातील काठोरा बाजार येथील हे सर्व भाविक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींना ढासाळवाडी येथील नागरिक तसेच पोलीस प्रशासनाने तात्काळ रुग्णालयात हलविले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com