पिकअप– दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू

पिकअप– दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू
Accident
AccidentSaam tv

बुलडाणा : बुलडाणा येथे बोलेरो पिकअप मालवाहक गाडी व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुलडाणा (Buldhana) शहरातील खामगाव रोडवरील वैष्णवीनगरजवळ घडली. (buldhana news Accident Pickup two wheeler one died on the spot)

माळविहीर येथील 26 वर्षीय दुचाकीस्वार राहुल देवराव आडवे असे अपघातात (Accident) मृत्यू झालेला तरुणाचे नाव आहे. राहुल हा बुलडाणा येथे कामानिमित्त आला होता. काम संपवून गावाकडे दुचाकीने माळविहीर येथे जात असताना खामगाववरुन बुलडाणाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार वर फेकला जावून खाली पडला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्‍यू (Death) झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com