शेतीच्या वादातून मारहाण; पीडित कुटुंबाला संरक्षणाची मागणी करत दलित संघटनेचा इशारा

शेतीच्या वादातून मारहाण; पीडित कुटुंबाला संरक्षणाची मागणी करत दलित संघटनेचा इशारा
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

बुलढाणा : जिल्ह्यातील देऊळघाट येथे शेतीच्या वादातून पारवे कुटुंबातील सर्व सदस्यांना 8 ते 10 गुंडाकडून बेदम मारहाण झाली. जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दोन महिला व एक वृद्ध उपचार घेत आहेत. ‘साम टीव्ही’वर बातमी प्रसारित होताच जिल्ह्यातील सर्व दलित नेत्यांनी रुग्णालयात (Hospital) पीडितांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे. (buldhana news Beatings over agricultural disputes)

Buldhana News
पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्‍या जाळ्यात; लाखाची लाच स्विकारताना ताब्‍यात

देऊळघाट येथील रामराव पारवे हे सीआरपीएफमध्ये (Buldhana News) कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर देऊळघाट येथील शेती वहीतीसाठी करीत असताना देऊळघाट येथील कलंदर खान यांनी शेती माझी असल्याचा दावा करीत पारवे कुटुंबावर अचानक जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वृद्ध रामराव पारवे यांना जबरदस्त मार लागल्याने पाठीवर व पायावर वळ उमटले असून गंभीर आहेत. तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून मारहाण केल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गुन्‍हे दाखलची मागणी

‘साम टीव्ही’वर बातमी प्रसारित होताच जिल्ह्यातील सर्व दलित नेत्यांनी रुग्णालयात पीडितांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस (Police) अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींवर गुन्हे दाखल करून आरोपीना अटक करा व भयभीत झालेल्या कुटुंबाला संरक्षण द्या अशी मागणी दलितांच्या विविध संघटनांनी केली आहे. तीन दिवसात कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com