Buldhana : वीजेअभावी शेतकऱ्यांची कामे रखडली; रविकांत तुपकरांनी मांडला थेट महावितरणच्या विभागात ठिय्या

रविकांत तुपकर यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थेट महावितरणच्या विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरू केले आहे
Buldhana News
Buldhana News saam tv

Ravikant Tupkar News : सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. परंतु जळालेल्या, नादुरुस्त विद्युत रोहित्रांमुळे वीजपुरवठा नाही आणि त्यामुळे पाणी देता येत नाही. १५ दिवस, महिना - महिना रोहित्र मिळत नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सदर समस्या पाहता संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थेट महावितरणच्या विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
Maharashtra Politics : 'भगत सिंह कोशियारींच्या काळ्या टोपीच्या खालचा मेंदू सडका'; राष्ट्रवादीची जोरदार टीका

शेतकऱ्यांच्या (Farmer) समस्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट बुलढाणा येथील चिखली मार्गावरील मेन्टनन्स विभागात ठिय्या मांडून मुक्काम आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतल्याने महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती घेतली असता त्यांनी ऑईल पाठविले असे ते सांगतात तर ऑईल मिळालेच नाही, असे येथील अधिकारी सांगत आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच खरीपात पावसाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आणि रब्बीतही विद्युत रोहित्र नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Buldhana News
Anil Parab : अनिल परब यांना मोठा दिलासा; दापोली रिसॉर्ट प्रकरणी अटकपूर्व जामीन

महिना-महिनाभर रोहित्रच मिळत नाहीत तर पिकांना पाणी कधी देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळेपर्यंत आता येथून हटणार नाही, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली असून मेंटेनन्स विभागात त्यांनी ठाण मांडत मुक्काम आंदोलन सुरु केले आहे.

तुपकरांच्या या आंदोलनामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रात्री उशीरापर्यंत रविकांत तुपकरांचे तेथेच तळ ठोकून होते तर विविध गावातील शेतकरी देखील त्यांच्यासोबत ठिय्या मांडून आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com