Buldhana Accident: जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात! भरधाव बोलेरो ३० फूट खोल नाल्यात कोसळली; महिलेचा जागीच मृत्यू

Buldhana Jalgaon Accident: मध्यप्रदेशच्या सीमेरील निमखेडी फाटा येथे तीन फुटी नाल्यावर ही घटना घडली.
Buldhana Accident
Buldhana AccidentSaamtv

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिकाच सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सकाळीच पुण्यातील नवले ब्रिजवर अपघात झाल्याची घटना समोर आली होती. आता बुलढाण्यातील जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये तो १ महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Buldhana Accident
Sharad Pawar Press Conference : राजीनामा मागे घेताना शरद पवार यांचा थेट भाजप नेतृत्वाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले...

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील जामोद- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या सीमेरील निमखेडी फाटा येथे तीन फुटी नाल्यावर ही घटना घडली. या अपघातात भरधाव बोलेरो ३० फूट खोल नाल्यात कोसळली. ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच मदतकार्यास सुरूवात झाली आहे. तसेच अपघातातील जखमींवर जळगावच्या जामोद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Buldhana Accident
Satara Police News: दुचाकी, चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, सातारा गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तब्बल 1 कोटी 18 लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार जिल्ह्यातही अपघात...

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर (National Highway 6) नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा फाट्याजवळ टोल नाक्याचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com