
बुलढाण्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देऊळगाव राजा येथे दहीहंडीसाठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत दुरी मुलगी जखमी झाली आहे. ही घटना आज रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदावर चढले होते. (Latest Marathi News)
दहीहंडी बांधलेल्या दोरला युवक लटकले त्यावेळी सिमेंटच्या पिलरसह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण (वय ९ वर्ष) ही चिमुकली जागीच ठार झाली.
तर अल्फिया शेख हाफिज (वय ८) तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. प्रथमोपचार नंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले. तर मृतक निदा पठाण हिस ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.