कुष्ठधाममधील रुग्णांना नाकारले रेशन धान्य

कुष्ठधाममधील रुग्णांना नाकारले रेशन धान्य
कुष्ठधाममधील रुग्णांना नाकारले रेशन धान्य
Ration cardSaam tv

बुलढाणा : रेशन कार्ड असताना धान्‍य घेण्यासाठी गेलेल्‍या कुष्‍ठरोग्‍यास परत फिरावे लागले. पॉस मशीनवर बोटाचे ठसे उमटत नसल्‍याचे कारण सांगत हे धान्‍य नाकारण्यात आले आहे. (buldhana news Ration grains denied to leprosy patients)

Ration card
धावत्‍या बसवर कोसळले झाड; बारा प्रवासी जखमी

जिल्ह्यातील एकमेव मोताळा तालुक्यातील चावरदा येथील शांतीवन कुष्ठधाम आहे. या कुष्ठधाममध्‍ये 20 ते 25 रुग्ण उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्ण बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील असून उपचार घेऊन वास्तव करीत आहे. या सर्व रुगणाचे रेशन कार्ड (Ration Card) काढण्यात आले आहे. जेव्हा रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता कुष्ठरोगांच्या हाताच्या बोटाचे ठसे पॉस मशीनवर उमटत नसल्याने रेशन धान्य देता येत नसल्याचे मोताळा तहसीलदार कार्यलयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

तरी धान्‍य देण्याचे आहेत आदेश

वास्तविकता ज्यांचे बोटांचे ठसे उमटत नसेल अशांनासुद्धा धान्य देण्याचे आदेश सरकारने दिलेले आहे. मात्र नियमाचा बडगा करून कुष्ठरोगांवर उपासमार आणण्याची वेळ संबंधित कर्मचाऱ्यांनी आणली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.