Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर कार जळून खाक, दोघांचा होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident : बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना समोर आली आहे.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam TV

Buldhana News: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून येथे सातत्याने अपघातांचं प्रमाण वाढत आहे. आता बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना समोर आली आहे.

भरधाव कार इम्पॅक्ट बॅरियरला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला. कारला लागलेल्या या आगीत दोघांचा भाजून मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये उडाला भडका; वाचा तुमच्या शहरात कितीने वाढल्या किंमती

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी समृद्धी महामार्गावर मुंबई कॉरिडॉरवरील चेनेज 305 वर एक भरधाव कार सुरुवातीला सिमेंटच्या रेलिंगला धडकून भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारला भीषण आग लागली. या कार मधून तीन प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी एक प्रवासी धक्क्याने बाहेर फेकल्या गेला व जखमी झाला. तर इतर दोघे मात्र आग लागलेल्या कारमध्ये अडकून भाजून मृत्युमुखी पडले. (Buldhana News)

Samruddhi Mahamarg Accident
Beed News : मित्रांसह विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, बीडच्या माजलगावातील घटना

कारमध्ये चार डिझेल कॅन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये डिझेलच्या चार ते पाच कॅन भरून डिझेल होते. त्यामुळे आग अजूनच वाढली. यातील जखमी झालेल्या प्रवाशाचं नाव अजय दिनेश भिलाला असून तो मध्यप्रदेशातील शाजापूर येथील आहे. तर इतर मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे अद्याप कळलेली नाहीत. या कारमध्ये डिझेलच्या कॅन आल्याने मोठी आग लागल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. महामार्ग पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com