Buldhana : ...अन् अचानक पाळणा कोसळला; घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल

यात्रेतील पाळणे दिवसागणिक धोकादायक
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

Buldhana News - बुलढाण्यात (Buldhana) एक थरारक घटना घडली आहे. मेहकर येथे भरलेल्या जत्रेत एक विचित्र घटना घडली. जत्रेतील एक पाळणा अचानक कोसळला. मेहकर येथील कलावंती महाला जवळ हजरत पहाडी सरकार दर्गा परिसरात उर्स शरिफ अर्थात यात्रा सुरू असताना याठिकाणी रात्री एक पाळणा कोसळला आहे. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. काशिफा फिरदोस असे या महिलेचे नाव आहे. हा पाळणा कोसळल्याचा थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (Buldhana Latest News)

Buldhana News
Nashik : अंगाशी आली स्टंटबाजी! नागाच्या चुंबनाचा प्रयत्न सर्पमित्राच्या जीवावर बेतला

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाळणा मालिकांच्या हलगर्जीपणामुळे हा पाळणा कोसळला. या महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून तिच्यावर उपचार सुरु आहे. महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात येत आहे. याठिकाणी कोरोना काळा नंतर मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे.

या यात्रेत हजारोंच्या संख्येने यात्रेकरू सामील झाले आहेत. या घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघाता प्रकरणी बुलढाणा पोलिसांकडून तपास सुरु असून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

या यात्रेतील मेळ्याला शासणाची कुठलीही पर्वांगी नव्हती अशी माहिती मेहेकर येथील तहसीलदार श्री गरकल यांनी दिली आहे. पूर्वी करमणूक कर घेतले जात होते तेव्हा महसूल विभागाची परवानगी लागत होती मात्र आता करमणूक कर रद्द झाल्याने अश्या मेळ्यांना परवानगी लागत नाही अशीही माहिती तहसीलदाराणी दिली.

यात्रेत लागलेल्या पाळणा किंवा इतर खेळण्याच्या साहित्यावर कोणत्या विभागाचे नियंत्रण असायला पाहिजे हा प्रश्न उपस्थित होत आहे. शासन म्हणते करमणूक कर नाही तरीही मेळ्या मध्ये खेळ खेळण्यासाठी भक्कम रक्कम तिकिटाच्या माध्यमातून खेळ मालक जमा करताना दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथील यात्रेत झालेल्या घटनेत जबाबदार कोण व असे मेले कोणाच्या परवानगी ने लागतात असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com