भगर खाल्ल्याने गावातील वीस जणांना विषबाधा

भगर खाल्ल्याने गावातील वीस जणांना विषबाधा
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

बुलढाणा : एकादशी असल्‍याने उपवासाची भगर खाल्याने तालुक्यातील दोन गावातील जवळपास १५ ते २० भाविकांना (Poisoning) विषबाधा झाली. त्यांना शहरातील विविध खासगी (Hospital) दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Buldhana Today News)

Buldhana News
Railway: भुसावळ विभागातील १८ रेल्वे गाड्या रद्द; चौथ्या रेल्वे लाईनचे काम

बुधवारी (२१ सप्‍टेंबर) एकादशी असल्याने अनेक लोकांनी (Buldhana) उपवास व्रत ठेवले होते. ग्रामीण भागातील काही लोकांनी उपवास असल्यामुळे भगर खाल्ली. परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चक्‍कर येण्यासारखे झाले. काहींना वाटले की ॲसिडीटीमुळे हे सर्व होत आहे. परंतु तब्येत अधिक बिघडताच त्यांना चिखलीमधील काही वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

गावातील दुकानातून भगर खरेदी

ज्या लोकांना भगरचे पीठ खाल्ल्याने त्रास झाला आहे. त्या सर्वांनी आपल्या गावातीलच दुकानातून भगर विकत घेतले होते. स्थानिक दुकानदारांनी तो माल चिखलीमधून घेतल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. याबाबत तपासणी केली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com