अवैध देशी दारूच्या विरोधात महिलांचा एल्गार; दारूचे दुकान हद्दपार करण्याची मागणी

आयुक्तच्या आदेशाला जिल्हा प्रशासनाने दाखविली केराची टोपली
अवैध देशी दारूच्या विरोधात महिलांचा एल्गार; दारूचे दुकान हद्दपार करण्याची मागणी
Buldhana NewsSaam Tv

बुलढाणा - लोणार (Lonar) तालुक्यातील बिबी या गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून गावातीलच महिला शासन दरबारी संघर्ष करीत आहेत. सुनीता भांड यांच्यासह इतर गावातील महिलांनी दारूबंदी व्हावी यासाठी विविध आंदोलने केली. बिबी ग्रामपंचायतीने चुकीचा ठाराव घेऊन देशीदारू दुकानमालकाला पाठबळ दिले होते त्या ठरावावर आक्षेप घेत विभागीय आयुक्त अमरावती (Amravati) कडे प्रकरण प्रविष्ट करण्यात आले होते.

हे देखील पाहा -

आयुक्तांनी तात्काळ जिल्हा परिषद सीईओ व जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश देऊन अहवाल सादर करावे व तोपर्यंत ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले. मात्र या आदेशाची जिल्हाप्रशासनाकडून सर्रास पायमल्ली केली जात असून देशीदारू दुकान बिनदिक्कतपणे सुरूच आहे. या विरोधात तक्रारकर्त्या महिलांनी पुन्हा बंड पुकारले व आत्मदाहनाचा इशारा दिला होता.

Buldhana News
दोंदवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी...

त्यानुसार काल देशी दारू दुकानासमोर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. वेळीच पोलीस, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांनी महिलेला पकडले व जीवितहानी टळली. मात्र आता आठ महिलांनी चक्क देशी दारू दुकानासमोरच ठिय्या देत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. जोपर्यंत देशीदारू दुकान बंद केल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com