Swine Flu: स्वाईन फ्लू ग्रस्त तरुणाचा अखेर मृत्यू

स्वाईन फ्लू ग्रस्त तरुणाचा अखेर मृत्यू
Buldhana News
Buldhana NewsSaam tv

बुलडाणाः जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या स्वाईन फ्लू रुग्णाचा मध्यरात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पहिला कोरोना संसर्गीत बुलडाणा (Buldhana) शहरात मिळाला होता. तो सुद्धा वाचू शकला नव्हता आणि आता पहिला स्वाईन फ्लू ग्रस्त सुद्धा मृत्यूच्या (Death) दाढेत सामावला आहे. (Buldhana News swine flu)

बुलडाणा शहरातील इकबाल चौकात राहणाऱ्या एका 32 वर्षीय युवकाला आठ दिवसांपूर्वी स्वाईन फ्लू आजाराची लागण झाली होती. त्याला बुलडाणा येथील जिल्हा महिला (Hospital) रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सुरुवातीला त्याची दोन वेळा (Corona) कोरोना टेस्ट करण्यात आली. परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याचा स्वॅब पुणे एनआयव्ही ला पाठविण्यात आला होता. हा युवक स्वाईन फ्लू ग्रस्त निघाला. त्याची लक्षणें गंभीर होती. यामुळे त्‍यास व्हेंटिलेटर्वर ठेवले होते. दरम्‍यान त्‍या युवकाची शनिवारच्या मध्यरात्री त्याची प्राणज्योत मालवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com