
बुलढाणा: हळू- हळू सिंदखेडराजा तालुक्यात कोरोनाचा (Corona) प्रकोप वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या तपासणी अहवालात साखरखेर्डा (Sakharkherda) परिसरातील तब्ब्ल ९२ शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह (Positive) आले आहेत. त्यामुळे पालक वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात वैधकीय अधिकारी डॉ , संदीप सुरुशे यांनी दिलेल्या माहितीनुसार साखरखेर्डा परिसरातील २४१ शिक्षकांची (teachers) कोरोना तपासणी करण्यात आली होती. (Buldhana Outbreak corona re infected 92 teachers)
हे देखील पहा-
त्यातमध्ये ९२ शिक्षकांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. आजपासून काही शाळा (School) सुरू होणार होते. शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी करुन घेणे गरजेचे होते. त्यानुसार साखरखेर्डा परिसरातील शिक्षकांनी चाचण्या करुन घेण्यात आले होते. त्यामध्ये ९२ जण पॉझिटिव्ह आले असल्याचे वृत्त आज येऊन धडकल्याने विद्यार्थी (Student), पालक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडित व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.