लाखोंची फसवणूक करणा-या दाेघांना बुलढाणा पोलिसांनी दिल्लीत केली अटक

पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.
Arrest
Arrest Saam Tv

Buldhana News : इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांचे चार्जिंग पॉइंट देण्याच्या नावाखाली बुलढाण्यातील (buldhana) पवनकुमार देशमुख यांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या दोन जणांना बुलढाणा शहर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मानव कृष्णकुमार शर्मा व शेखर प्रकाशचंद्र शर्मा (सर्व राहणार विकास नगर, गौतम नगर नांगलोई पश्चिम दिल्ली) असे आहेत. हे दाेघे सध्या पोलीस (police) कोठडीत आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांचे चार्जिंग पॉइंट देण्याच्या नावाखाली इलेक्ट्रो चार्जिंग पॉईंट कंपनी तयार करीत फेक वेबसाईट तयार करून त्यांची सोशल मीडियाद्वारे जाहिरात करून व चार्जिंग स्टेशन घेण्यासाठी सरकारी अनुदानाबाबत आणि चार्जिंग पॉइंट घेणाऱ्या उमेदवारास भविष्यात होणाऱ्या फायद्याबाबत प्रलोभन देत चार्जिंग पॉइंट घेणाऱ्यांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही फक्त रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार असे सांगून बुलढाणा शहरात इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग पॉइंट देण्यासाठी बुलढाण्यातील पवन कुमार देशमुख यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने 6 लाख 80 हजार रुपये घेवून त्यांची फसवणूक करण्यात आली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून 27 जानेवारी रोजी बुलढाणा शहर पोलिसांनी ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीसह सायबर क्राईमचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशी अंती निष्पन्न झालेल्या आरोपींना बुलढाणा शहर पोलिसांच्या पथकांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्याचे नांव मानव कृष्णकुमार शर्मा व शेखर प्रकाशचंद्र शर्मा (सर्व रा. विकास नगर, गौतम नगर नांगलोई पश्चिम दिल्ली) असे आहे. दोन्ही संशयित आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठंडी मिळाली आहे अशी माहिती प्रल्हाद काटकर (ठाणेदार बुलढाणा शहर) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Arrest
Video : वेदांतानंतर 'हा' प्रकल्प जाणार महाराष्ट्र बाहेर ? सरकारनं गमावली एक लाख काेटींची गुंतवणुक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com