
Latest Buldhana News : चिखलीत काँग्रेसचे माजी आमदार राहुल बाेंद्रे यांनी तुफान राडा घातल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. माजी आमदार राहुल बाेंद्रेंसह समर्थकांनी भाजपच्या श्याम वाकदकरांना रस्त्यावरच मारहाण केली होती. या प्रकरणी आता राहुल बोंद्रे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
बोंद्रे यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कलम 395, 397, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. बोंद्रे यांनी रस्त्यात अडवून वडीलांच्या विरोधात फेसबुकला पोस्ट का टाकली म्हणत केली मारहाण भाजपच्या (BJP) श्याम वाकदकरांना रस्त्यावरच मारहाण केली होती. इतकेच नाही तर गळ्यातील सोन्याची चैन, रुद्राक्षाची माळ आणि नगदी 5 हजार देखील हिसकवले असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडीलांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी समाज माध्यमातून (social media) केली होती. त्यामुळेच हा प्रकार घडला अशी चर्चा हाेती. दरम्यान स्वतः राहुल बोंद्रे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.
कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट खपवून घेतली जाणार नाही, आज थोडक्यात झाले, यानंतर परिणाम वाईट होतील असा इशारा ही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला. या घटनेनंतर वाकदकर यांना बुलडाणा (Buldhana) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेवरुन अद्याप काेणत्याही गटाकडून पाेलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पाेलिसांनी राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाजवळ बंदोबस्त वाढविला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.