लसीच्या सक्तीचा फतवा आजच रद्द करा, अन्यथा रोषाला सामोरे जा...!

लसीकरण केल्याशिवाय शासनाचे लाभ न देण्याचा बुलढाणा जिल्हा प्रशासनाने काढला आदेश
लसीच्या सक्तीचा फतवा आजच रद्द करा, अन्यथा रोषाला सामोरे जा...!
लसीच्या सक्तीचा फतवा आजच रद्द करा, अन्यथा रोषाला सामोरे जा...!संजय जाधव

बुलढाणा - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा अत्यल्प प्रतिसाद आहे. राज्यात कोरोना लसीकरणात बुलढाणा जिल्हा हा खूपच मागे असल्याने जिल्हा प्रशासनाने लसीकरणाला वेग यावा म्हणून नागरिकांचं प्रबोधन करणे सोडून नागरिकांना सक्ती करत लसीकरण करा नाही तर शासकीय योजनांचा लाभ देऊ नका असे आदेश मेहकर उपविभागीय अधिकारी, बुलढाणा तहसिलदार व जिल्ह्यातील इतर उपविभागात काढल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. 

हे देखील पहा -

अनेक ठिकाणी लसीकरणाची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर रविकांत तुपकर यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे. नागरिकांना उपाशी मारून लसीकरण करण्यापेक्षा नागरिकांचे उद्बोधन, प्रबोधन करून लसीकरण करा, सक्ती केल्यास किंवा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणल्यास स्वाभिमानाच्या रोषाला सामोरे जा असा इशारा रविकांत तुपकर यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com