
Bull Fight Video : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातल्या कोपरगाव शहरातील गुरूद्वारा रोडवर भर रस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने आले. यावेळी दोघांमध्ये झुंजीचा चांगलाच सामना रंगला. भर रस्त्यात या दोन्ही बैलांनी (Bull) अक्षरशः धुडगूस घातला होता. यावेळी परिसरातील नागरिकांनी या प्रकाराचे चित्रिकरण केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (Bull vs Bull Fights Viral Video)
जवळपास अर्धा ते पाऊण तास या दोघांमध्ये चांगलीच झुंज (Fight) रंगली होती. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला होता. दुसरीकडे रिमझीम पावसात बुल फाईटचा थरार अनुभवयास मिळाल्याने नागरिकांचे चांगलेच (Viral Video) मनोरंजन झाले.
दौन बैलांची भर रस्त्यात सुरू असलेली झुंज चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष बाब म्हणजे या झुंजीदरम्यान एकही बैल माघार घ्यायला तयार नव्हता. दरम्यान, काही वेळानंतर नागरिकांनी पुढं येत या दोन्ही बैलांची झुंज थांबवली. कोपरगाव शहरांमध्ये रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. (Bull Fight In India Viral Video)
या जनावरांमध्ये अनेकदा झुंज होताना दिसत असते. अनेक शासकीय कार्यालय ,रुग्णालये या रस्त्यावर असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शुक्रवारी घडलेला प्रकार कॅमेरा मध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.