
औरंगाबाद - शहरातील बहुचर्चित लेबर कॉलनीतील घरांवर उद्या सकाळी ६ वाजताच बुलडोझर फिरविला जाणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस (Police) प्रशासनाने कारवाई करण्याची पूर्ण तयारी केलीये. लेबर कॉलनी इथं २० एकर सरकारी जागेवर १९५३ मध्ये शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली होती. इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबांनीही या घरांचा ताबा साेडला नाही.
त्यामुळे ही घरे पाडून जिल्हा प्रशासन ही जागा आपल्या ताब्यात घेणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून इथल्या रहिवाशांचा घरे पाडण्याला आणि रहिवाशी हटवण्याला कडाडून विरोध केला होता, मात्र आता ३३८ घरे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असल्यानं कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. घरे रिकामी नाही केल्यास बळाचा वापर करून जागा ताब्यात घेतली जाणार आहे.
हे देखाली पाहा -
बुधवारी सकाळी ६ वाजताच पाडापाडीच्या कारवाईला सुरुवात होईल. त्यासाठी ५०० पोलिस, १५० अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. घरे पाडण्यासाठी ३० जेसीबी आणि २०० मजुर काम करणार आहेत. घरे पडताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून या भागात बुधवारी जमावबंदी लागू असणार आहे. औरंगाबाद हे शहर संवेदनशील असल्यानं या पाडापाडीचे पडसाद शहरात उमटू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरु केली आहे. उद्या सकाळी कारवाई सुरु होणार असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. मात्र, यावरूनही आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येत आहे.
दुसरीकडे औरंगाबादमधील लेबर कॉलनीतील नागरिकांना वेगळा न्याय आणि मुंबईतील बीडीडी चाळीतील नागरिकांना वेगळा न्याय का, असा सवाल भाजपकडून उपस्थित केला गेला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आहे म्हणून त्यांची सोय करायची आणि औरंगाबादचे मतदारसंघात नाही म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडणार का? त्यासाठी शहरातील कोणत्याही जागी या नागरिकांचे पुनर्वसन करावं, अशी मागणी भाजपचे जिलाध्यक्ष आणि मराठवाडा म्हाडाचे सभापती संजय केणेकर यांनी केली.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.