Beed: गेवराई शहरात भररस्त्यात मोकाट मदमस्त वळूंची झुंज; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, या अगोदर बीड (Beed) माजलगावमध्ये तर आता गेवराईमध्ये भररस्त्यात मोकाट जनावरांमध्ये झुंज पाहायला मिळाली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात पुन्हा मोकाट जनावरांमध्ये झुंज होऊ नये, ज्याने करून एखादी दुर्घटना देखील होऊ शकते.
Beed Bullfighting
Beed Bullfightingविनोद जिरे

बीड - गेवराई शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या, स्टेट बँक ऑफ इंडियासमोर (State Bank Of India) भररस्त्यात मदमस्त वळूंची झुंज लागली होती. ही झुंज जवळपास अर्धा तास चालू होती. तर ही झुंज पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. परंतु ही झुंज सोडवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. यामुळं नागरिकांमध्ये काहीशी धावपळ देखील उडाली होती. तर या सर्व प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. bullfighting in beed)https://twitter.com/saamTVnews/status/1479324727395045379

दरम्यान, या अगोदर बीड (Beed) माजलगावमध्ये तर आता गेवराईमध्ये भररस्त्यात मोकाट जनावरांमध्ये झुंज पाहायला मिळाली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात पुन्हा मोकाट जनावरांमध्ये झुंज होऊ नये, ज्याने करून एखादी दुर्घटना देखील होऊ शकते. यामुळं प्रशासनाने या सारख्या घटनांना वेळीच आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com