चोरट्यांचा धुमाकुळ; एका रात्रीत 4 घरांमध्ये चोऱ्या.. चोरटे CCTV मध्ये कैद

सगळ्या ठिकाणी चोरी ची पद्धत एकच असल्याने एकाच टोळीने या सर्व चोऱ्या केल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
चोरट्यांचा धुमाकुळ; एका रात्रीत 4 घरांमध्ये चोऱ्या.. चोरटे CCTV मध्ये कैद
चोरट्यांचा धुमाकुळ; एका रात्रीत 4 घरांमध्ये चोऱ्या.. चोरटे CCTV मध्ये कैदSaam Tv

मंगेश मोहिते -

नागपूर : कपिल नगर KapilNagar परिसरात एकाच रात्रीत चार ठिकाणी तर जरीपटका परिसरात दोन ठिकाणी चोरीचा घटना उघडकीस आला मात्र सगळ्या ठिकाणी चोरी (Theft) ची पद्धत एकच असल्याने एकाच टोळीने या सर्व चोऱ्या केल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

हे देखील पहा -

कपिल नगर परिसरात दोन फ्लॅट आणि दोन घरात चोरी झाली त्यापैकी दोन ठिकाणी सोन्याचे दागिने आणि काही नगदी रक्कम चोरीला गेली. एका फ्लॅट मध्ये मात्र  3 चोरांची टोळी CCTV मध्ये कैद झाली त्यावरून पोलिसांनी (Police) आता या टोळीचा शोध सुरू केला असून याच टोळीने सगळ्या चोऱ्या केल्या असण्याचा अंदाज वर्तविला आहे.

चोरट्यांचा धुमाकुळ; एका रात्रीत 4 घरांमध्ये चोऱ्या.. चोरटे CCTV मध्ये कैद
पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात: कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा

दिवाळीत अनेक जण घराला कुलूप लावून बाहेर गावी जातात याचा फायदा चोरटे घेत असण्याचा अंदाज आहे. मात्र एकाच दिवशी दोन भागात 6 चोरीच्या घटना घडल्याने कुठली मोठी गॅंग तर सक्रिय झाली नाही ना अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com