Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, ७ गंभीर जखमी

बसमधून १२ प्रवासी प्रवास करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने बसला जबर धडक दिली.
Accident News
Accident Newssaam tv

Amravati Accident News Today: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर अंजनगाव मार्गावर भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघातात ५ जणाचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार बसमधून १२ प्रवासी प्रवास करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने बसला जबर धडक दिली. यात ५ जणाचा मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी असून जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय (Hospital) दर्यापूर येथे हलविण्यात आले.

Accident News
Nagpur Crime News: क्रिकेटने घेतला आई अन् लेकराचा जीव; दोघांवर एकाचवेळी झाले अंत्यसंस्कार

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती (Amravati) येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णलायत दाखल केले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करत आहेत. (Accident News)

Accident News
Pandharpur Wari 2023: पाऊले चालती पंढरीची वाट… श्रींच्या पालखीचे शुक्रवारी संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान

बुलढाण्यात बस-कंटेनरचा भीषण अपघात

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजिक ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकूण मृतकांची संख्या 8 झाली असून 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातात (Accident) जखमी झालेल्या लोकंना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com