Nashik Bus Fire : नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार; प्रवासी खाली उतरताच एसटी जळून खाक

शहादा - नाशिक बसला ही आग लागली आहे. बस शहादाहून निघाल्यानतंर राहुड घाटात असताना अचानक धूर निघू लागला.
Nashik News
Nashik NewsSaam Tv

नाशिक : नाशिकमध्ये एसटी महामंडळाची धावती बस रस्त्यात पेटल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात ही घटना घडली. सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा - नाशिक बसला ही आग लागली आहे. बस शहादाहून निघाल्यानंतर राहुड घाटात असताना अचानक धूर निघू लागला. काही वेळातच धूराचं रुपांतर आगीत झालं आणि संपूर्ण बसने काही क्षणात पेट घेतला. (Maharashtra News)

Nashik News
Raj Thackeray Parli News : राजप्रेमींचा भाजप, एनसीपीच्या बालेकिल्ल्यात धुडगूस; उत्साहाच्या भरात...

मुंबई -आग्रा महामार्गावर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान शहादा येथून नाशिककडे जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केलं. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी केली. बसमधील 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

Nashik News
Latur ST Bus Accident : लातुरात एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटून भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. सोमा टोल कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. काही क्षणातचं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.मात्र काही वेळ या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com