Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेबांनी देखील सोडली होती शिवसेनेची साथ; नेमकं काय घडलं होतं ?

त्यांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला होता.
Balasaheb Thackeray Jayanti
Balasaheb Thackeray Jayanti Saam TV

Balasaheb Thackeray Jayanti : आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवसैनीकांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आहे. बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना फार वेगळी होती. मात्र आताची परिस्थित फार वेगळी आहे. शिवसेना पक्षात गेल्या ६ महिन्यांपासून चांगलच सत्तानाट्य दिसत आहे.

शिवसेना पक्ष आणि ठाकरे कुटुंबीय यांना सध्या सतत नवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं आहे. अशीच काट्याची वाट बाळासाहेबांच्या मार्गात देखील आली होती. त्यावेळी त्यांनी स्वत: शिवसेनेतून काढता पाय घेत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज या बातमीतून हाच किस्सा माहीत करून घेऊ. (Latest Balasaheb Thackeray Jayanti News)

जेष्ठ पत्रकार प्रकाश आकोलकरांच्या जय महाराष्ट्र या पुस्तकात हा किस्सा सांगण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत नेहमीच फणसाप्रमाणे काम केले. बाहेरून ते कठोर आणि शिस्तप्रिय दिसत असले तरी मनाने ते तितकेच साधे आणि प्रेमळ होते. राजकारणात येण्याआधी एका वर्तमानपत्रात ते व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांनी नोकरी सोडून पुढे १९६६ साली शिवसेना पक्षाची स्थापना केली. राजकारणात त्यांनी सत्तेत असताना आणि नसताना देखील मराठी माणसासाठी अनेक कामं केली.

Balasaheb Thackeray Jayanti
Prakash Ambedkar : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार का? प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'राष्ट्रवादी आणि काँग्रेस...'

साल १९८५ मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षात सक्रिय झाले. यावेळी शिवसेनेमध्ये बळवंत मंत्री, श्याम देशमुख, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी , माधव देशपांडे, श्याम देशमुख, मनोहर जोशी हे पहिल्या फळीतले नेते होते. पक्षात होत असलेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सक्रिय सहभाग या नेत्यांना पटत नव्हता. त्यामुळे १९९० च्या निवडणूकीत शिवसेनेला अपयश आले. पुढे छगळ भुजबळांनी शिवसेना सोडली.

Balasaheb Thackeray Jayanti
Uddhav Thackeray Breaking : ठाकरेंची अडचण वाढणार? उद्धव ठाकरेंबाबत महत्वाची बातमी

तसेच माधव देशापांडे यांनी बाळासाहेबांवर अनेक आरोप केले. बाळासाहेब पक्षामध्ये घराणेशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे स्वत: शिवसेनेचा नाश करत आहेत. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या टीकेचा बाळासाहेबांना प्रचंड राग आला आणि दु:ख ही झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com