'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाकडून स्थगित.
'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगितSaamTv

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’ चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. By-elections of 'those' Zilla Parishad and Panchayat Samiti postponed

राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली.

हे देखील पहा -

श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

'त्या' जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडेल - दत्तात्रय भरणे

सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते.

त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचार संहितादेखील आजपासून शिथिल करण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com