प्रचार थंडावला: रायगडात महाविकास आघाडी एकत्र नाहीच; भाजप, मनसेही स्वबळावर...

राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी रायगड जिल्ह्यात सहाही नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत.
प्रचार थंडावला: रायगडात महाविकास आघाडी एकत्र नाहीच; भाजप, मनसेही स्वबळावर...
प्रचार थंडावला: रायगडात महाविकास आघाडी एकत्र नाहीच; भाजप, मनसेही स्वबळावर...राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, पाली आणि खालापूर या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 19 डिसेंबरला प्रचाराची सांगता झाली असून आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकार असले तरी जिल्ह्यात सहाही नगरपंचायत (Nagar Panchayat Election) निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. भाजप आणि मनसे हे स्वबळावर आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्यानंतर आता प्रचार थांबला आहे. त्यामुळे 21 डिसेंबरला मतदार राजा आता कोणाला कौल देणार याचे चित्र 19 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. (Campaign Ends: Maha Vikas Aghadi not united in Raigad; BJP, MNS also on their own)

हे देखील पहा -

रायगड (Raigad) जिल्ह्यात सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया 21 डिसेंबरला होत आहे. जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शेकाप, मनसे हे प्रमुख पक्ष आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने वरिष्ठ पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढण्याबाबत बोलले जात होते. मात्र जिल्ह्यात असे चित्र पाहण्यास मिळालेले नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पाली, माणगाव, तळा, म्हसळा, खालापूर, माणगावमध्ये सोयीनुसार काँग्रेस आणि इतर पक्षासोबत आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही स्वबळावर सत्ता खेचून आणण्यासाठी तटकरे कुटूंब प्रचारात रंगले होते.

प्रचार थंडावला: रायगडात महाविकास आघाडी एकत्र नाहीच; भाजप, मनसेही स्वबळावर...
१००-२०० नव्हे, तब्बल '१००० कोटी रुपये वसुली'चं ठाकरे सरकारचं टार्गेट! - भाजप आमदाराचा गंभीर आरोप...

काँग्रेस पक्ष हा आघाडी आणि युतीमध्ये नशीब आजमावत आहे. भाजप, मनसे आणि शेकाप ही स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे रंगले असल्याने राज्य सरकारात एकत्र असले तरी या निवडणुकीत वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाने या निवडणुकीत सत्ता खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपनेही जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. एकंदरीत 21 डिसेंबरला होणाऱ्या मतदानवेळी आता मतदार राजा हा कोणाला कौल देणार हे 19 जानेवारी रोजी कळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com