गरीब विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षणाची वारी,विद्यार्थ्यांच्या दारी' या मोहिमेची सुरुवात

ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
गरीब विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षणाची वारी,विद्यार्थ्यांच्या दारी' या मोहिमेची सुरुवात
गरीब विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षणाची वारी,विद्यार्थ्यांच्या दारी' या मोहिमेची सुरुवातविजय पाटील

सांगली -  कोरोना Corona काळात ऑनलाइन शिक्षण Online study ही संकल्पना आली खरी पण ज्यांच्याकडे मोबाईल Mobile नाहीत ती खेड्या-पाड्यातील गरिबांची लेकरं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत. परिणामी त्यांच्या शिक्षणाचं आबाळ होत आहे. त्यामुळे ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर फेकले जात असल्याने हीच समस्या लक्षात घेत सांगलीच्या कुंडल मधील क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांच्या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कुलमधील School ३५  हुन अधिक शिक्षकांनी 'शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी'  या मोहिमेची सुरुवात केली आहे. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

कुंडल मधील या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कुलमध्ये पाचवी ते दहावी इयतेत साधारण १३०० विद्यार्थी आहेत. पण कोरोनाच्या निर्बंधामुळे बराच काळ शाळा बंद राहिल्यात. त्यामुळे हायस्कुलच्या या प्रागणात फक्त शिक्षकांचीच लगबग दिसून येत आहे. या हायस्कुल मधील १३०० पैकी ७००-८०० विद्यार्थी हे ऑनलाइन क्लासला हजर राहतात. उर्वरित २००-३०० विद्यार्थी हे केवळ घरात मोबाइल नसल्याने ऑनलाइन क्लासला बसू शकत नव्हती.

हे देखील पहा -

त्यामुळे या २००-३०० विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार, हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर जातील काय अशी भीती शिक्षकांना सतावत होती. त्यात ही सारी मुलं गरीब, शेतकरी, मजूर कुटुंबातील. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या  प्रवाहात आणण्यासाठी शाळेने  काही दिवसांपासून  आपल्या ३५ शिक्षकाच्या मदतीने 'शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी' हा उपक्रम हाती घेतला.

हा उपक्रम राबवायला सुरुवात करण्याअगोदर शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बनवली. यामध्ये पाचवी ते आठवी मधील काही गावातीलच विद्यार्थी होते. तर काही विद्यार्थी हे वाडी-वस्तीवर मजुर कुटूंबातील होते. गावातील विद्यार्थ्यांसाठी मग मंदिराची जागा निवडली गेली. मंदिरातचपाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा भरली. ३५ शिक्षकाची टीम मधील एक एक शिक्षक वेळापत्रक आखून यातील सर्व विद्यार्थ्यांना शिकवू लागले.

गरीब विद्यार्थ्यांसाठी 'शिक्षणाची वारी,विद्यार्थ्यांच्या दारी' या मोहिमेची सुरुवात
मला चिकन हवं आहे... डिसचार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णाचा अनोखा हट्ट

दुसरी जागा निवडली गेली ती वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी. वाडी-वस्तीवर  शिक्षक जाऊन  पत्र्याच्या घराच्या शेड भोवती जी जागा मोकळी दिसेल तिथे झाडाखाली जे विद्यार्थी गोळा होतील त्यांना शिक्षक शिकवू लागले. कधी कविता, कधी कथा तर कधी मोठ्याने वाचन करायला सांगत या वाडी-वस्तीवरची मुले शिक्षणापासून दूर जाऊ नयेत यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. अशा उघड्या वरच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचा फार काही अभ्यास होईल अशी शिक्षकाना फार अपेक्षा नाही.

केवळ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावा, त्याच्या कानावर शिक्षकाचे चार शब्द पडावेत हीच भावना आहे. दिवसातील 2-3 तास तरी मंदिरात किंवा वाडी-वस्तीवर एकत्र येत शिक्षक शिकवत असल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या या  विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मागील वर्षीचा अभ्यासक्रमाची मुलाना उजळणी करून देण्याचा प्रयत्न होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com