Akola: आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बगीच्यात गांजाची झाडे; रखवालदाराला अटक

या गांजाची किंमत चार लाखांच्यावर असल्याची माहिती आहे.
Akola: आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बगीच्यात गांजाची झाडे; रखवालदाराला अटक
Akola NewsSaam Tv

अकोला - पातूर येथील एका आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बगीच्यातून पोलिसांनी तब्बल 142 गांजाची झाडे जप्त केली आहेत. या गांजाची किंमत चार लाखांच्यावर असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी रखवालदाराला अटक करण्यात आली आहे. या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून (Police) मिळविलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या विशेष पथकास गुप्त माहिती मिळाली की, अकोल्यातील (Akola) पातूर येथील ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयातील बगीच्यामध्ये गांजाची झाडे लावण्यात आली आहेत.

हे देखील पाहा -

या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली असता, महाविद्यालयाच्या बगीच्यात तब्बल 142 झाडे गांजाची आढळून आली. पोलिसांनी ही झाडे नष्ट केली आहेत. या झाडांची किंमत तब्बल चार लाखांच्यावर आहे. दरम्यान या प्रकरणी महाविद्यालयाच्या रखवालदाराला अटक करण्यात आली आहे. रखवालदार प्रकाश सुखदेव सौंदळे हा या झाडांची रखवाली करताना आढळून आला.

Akola News
महागाईचा आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

रखवालदार सौंदळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आयुर्वेदिक महाविद्यालयात गांजाची झाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयात नेहमी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी गांजाच्या झाडाची लागवड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पातूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.