बस स्टॉपवर उभ्या असलेल्या इसमाकडून 3 लाख रुपयांचा गांजा जप्त

बस स्टॉपवर उभा असलेल्या एका इसमाकडून आज बुलढाणा शहर पोलिसांनी कारवाई करत जवळपास तीन लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
बस स्टॉपवर उभ्या असलेल्या इसमाकडून 3 लाख रुपयांचा गांजा जप्त
बस स्टॉपवर उभ्या असलेल्या इसमाकडून 3 लाख रुपयांचा गांजा जप्तसंजय जाधव

बुलढाणा: शहराजवळ असलेल्या सहकार विद्या मंदीर बस स्टॉपवर उभा असलेल्या एका इसमाकडून आज बुलढाणा शहर पोलिसांनी कारवाई करत जवळपास तीन लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. (Cannabis worth Rs 3 lakh seized in buldhana)

हे देखील पहा -

गुजरात मधील वलसाड जिल्ह्यातील बिलीमोरा तालुक्यातील चिखली येथील या इसमाला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी एका गोपनीय माहितीनुसार बुलढाणा शहर पोलिसांनी सापळा रचत चिखली मार्गावरील सहकार विद्या मंदिरासमोर असलेल्या बस स्टॉपवर हा इसम आपल्या सोबत चार मोठ्या पिशव्यात 40 किलो गांजा घेऊन उभा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

बस स्टॉपवर उभ्या असलेल्या इसमाकडून 3 लाख रुपयांचा गांजा जप्त
दारू आणि कोंबड्यासह महिला व अपंगांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा

त्यानुसार पोलोसानी 40 किलो गांजासह या व्यक्तीला अटक केली असून 2 लाख 745 हजार रूपयाचा गांजा पकडला. हा गांजा नवी मुंबईला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास बुलढाणा पोलीस करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com