Aurangabad दुर्घटना : सासू-सासरे अन् सुनेसहीत संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला

एकलहरा देवीच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला
Aurangabad दुर्घटना : सासू-सासरे अन् सुनेसहीत संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला
Aurangabad दुर्घटना : सासू-सासरे अन् सुनेसहीत संपूर्ण कुटुंबावर काळाचा घालाSaam Tv

औरंगाबाद : एकलहरा देवीच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या कुटुंबीयांवर काळाने घाला घातला आहे. देवीच्या दर्शनाकरिता जाताना, कार बंधाऱ्यात पडल्याने, सासू-सासरे आणि सुनेचा नाका- तोंडात पाणी शिरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबामधील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. बंधाऱ्याला सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नसल्यामुळे हा धक्कादायक अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी २५ अग्निशमन दलाच्या जवानांनी ५ तास मेहनत करून अपघातग्रस्त कार पाण्याच्या बाहेर काढली आहे. वैजिनाथ उमाजी चौधरी (वय-५२), मंगल वैजिनाथ चौधरी (वय-४५) आणि सुकन्या मधुर चौधरी (वय-२२) असे मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. संबंधित सर्वजण औरंगाबाद या ठिकाणी असलेल्या सेलूद परिसरामधील रहिवासी आहेत. दिलेल्या माहितीनुसार, मृत वैजिनाथ मंगळवारी दुपारी आपल्या कारने पत्नी आणि सुनेला घेऊन एकलहरा देवीच्या दर्शनाकरिता जात होते.

हे देखील पहा-

जडगाव या ठिकाणी नातेवाईकांना भेटून पुढे एकलहरा देवीच्या दर्शनाकरिता जाण्याचा त्यांचा बेत होता. जडगाव ता. औरंगाबाद या ठिकाणी असलेल्या नातेवाईकांना भेटल्यावर हे कुटुंब एकलहर देवीच्या दर्शनाकरिता मार्गक्रमण झाले होते. दरम्यान मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास लाडगाव या ठिकाणी जात असताना, जडगावच्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ वैजिनाथ याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट बंधाऱ्यात जाऊन पडली आहे.

Aurangabad दुर्घटना : सासू-सासरे अन् सुनेसहीत संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला
Pune: एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीस अटक (पहा व्हिडिओ)

अवघ्या क्षणार्धात घडलेल्या या अपघाताने कोणालाही सावरता आले नाही. यातच वैजिनाथ यांनी आपल्या कुटुंबीयांना मोबाइलवरून अपघात झाल्याची माहिती दिली आहे. पुढच्या क्षणात त्यांचा मोबाइल बंद पडला. बंधाऱ्यात ३० ते ४० फूट खोल पाणी असल्यामुळे तिघांच्या नाकातोंडात पाणी शिरून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी लगेचच धाव घेतली. अग्निशमन दलाच्या २५ जवानांनी ५ तास अथक मेहनत केल्यावर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बंधाऱ्याला सुरक्षा भिंती नसल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.