कोल्हापुरात कारचा भीषण स्फोट; दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यू
कोल्हापुरात कारचा भीषण स्फोट; दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यूसंभाजी थोरात

कोल्हापुरात कारचा भीषण स्फोट; दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यू

कोल्हापुरमध्ये गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये Kolhapur कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ते मुरगूड रस्त्यावर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कार थेट 200 मीटर दरीत कोसळली. आहे. या अपघातात कारने पेट घेतला आणि यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून मरण पावला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

हे देखील पहा-

प्राथमिक माहितीनुसार, कागल - मुरगूड रस्त्यावर वाघजाई भागात हा अपघात झाला आहे. सकाळी धावत्या कारमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर ही गाडी थेट दोनशे मीटर दरीत जाऊन कोसळली. यामुळे कारने पेट घेतला. यामध्ये आगीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात कारचा भीषण स्फोट; दरीत कोसळली कार, एकाचा होरपळून मृत्यू
राज्यात लसीकरणासाठी राज्य सरकार राबवणार औरंगाबाद पॅटर्न?

आग अवधी भीषण होती की, कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारच्या शेजारीच एक व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृत व्यक्ती कोण आहे याबाबत सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. तर चालत्या कारमध्ये स्फोट झाल्यानंतर हा अपघात झाला आहे ? की कार दरीत कोसळून स्फोट झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com