नागरिकांनी अनुभवला Burning Car चा थरार
burning car

नागरिकांनी अनुभवला Burning Car चा थरार

सांगली : सांगली येथे मध्यरात्री सांगली मिरज रस्त्यावरील जिल्हा परिषद नजीक अचानक चार चाकी वाहन पेटले. त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. हे वाहन शॉर्टसर्किटमुळे पेटल्याचा burning car अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित वाहन चालकाने तातडीने वाहन थांबवून बाहेर पडला. या घटनेची माहिती नागरिकांनी अग्निशमन विभागास दिली. ताेपर्यंत काही नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले हाेते.

अग्निशमन विभागास याची माहिती देण्यात आल्याने या विभागाचे कर्मचारी काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. या कर्मचा-यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळेतच आग आटाेक्यात आली.

burning car
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

सुदैवाने या घटनेत काेणीही जखमी झाले नाही. संबंधित वाहनाचे नुकसान झाले आहे. गणेशाेत्सव असल्याने रस्त्यावर नागरिकांची वर्दळ हाेती. त्यामुळे येथे बघ्यांची गर्दी जमली होती.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com