लातूरमध्ये बर्निंग कारचा थरार; कुटुंब थोडक्यात बचावले

वेळीच सावधगिरीने कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
लातूरमध्ये बर्निंग कारचा थरार; कुटुंब थोडक्यात बचावले
Latur Car FireSaam Tv

लातूर: लातुरमध्ये (Latur) बर्निंग कारचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक रस्त्यावर एका कारने पेट घेतला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास लातूर-लामजना या राज्य मार्गावर घडली. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. वेळीच सावधगिरीने कारमधून (Car) बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Latur Car Fire
Raigad | घोणसे घाटात बसला अपघात; २ जणांचा मृत्यू, ५०हुन अधिक जण जखमी

अचानक चालती कारने पेट घेतला. यात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कार पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास लातूर - लामजना या राज्यमार्गावर घडली आहे. लातूर वरून किल्लारीकडे एका कार्यक्रमासाठी पती-पत्नी आणि दोन लहान मुलं असे कुटुंब या कारमधून जात होते. यावेळी अचानक कारने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच ते गाडीतून बाहेर आले. त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही पण गाडी पुर्णपणे जळून खाक (Fire) झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.