
सचिन कदम
रायगड : कोथरुड पुणे येथून रायगडकडे येणाऱ्या प्रवाशांच्या कारला ताम्हाणी घाटात भीषण अपघात (Accident) झाला आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोंडेघर गावच्या दरम्यान घाट रस्त्यातील वळणावर चालाकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट ३० ते ४० फुट दरीत कोसळली. या अपघातामध्ये प्रकाश मुरलीधर पंडीत या ७३ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. (The car crashed into a ravine in Tamhini Ghat raigad; One passenger was killed and six others were seriously injured)
हे देखील पाहा -
या अपघातात चालक राहूल पंडीत, गौरी पंडीत, प्रणाली पंडीत, मानसी पंडीत, अर्जुन पंडीत, मंजुश्री पंडीत हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक आणि प्रवाशांच्या मदतीने मयत आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात चालक राहुल पंडीत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.