पेट्रोलची टाकी फुल करत कारचालक ठोकताहेत धूम; पंपावर घडताहेत अजब प्रकार

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
पेट्रोलची टाकी फुल करत कारचालक ठोकताहेत धूम; पंपावर घडताहेत अजब प्रकार
Petrol Saam Tv

संजय जाधव

बुलडाणा : रशिया-युक्रेन (Russia) यांच्यात भडकेल्या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या. परिणाम देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले. अशातच इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून वेगळ्याच घटना घडत आहेत. कारचालक पंप कर्मचाऱ्यांना कारची टाकी फुल करायला सांगतात आणि टाकी फुल होताच पैसे न देताच धूम ठोकतात. या घटनांमुळे पेट्रोल (Petrol) पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून असे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. वाहनचालक पंप कर्मचाऱ्यांना कारची टाकी फुल करायला सांगतात, आणि टाकी फुल झाल्यानंतर पैसे न देताच ते भरधाव वेगाने निघून जातात. असा प्रकार दोन महिन्यापूर्वी शेगाव येथील बाबजी पेट्रोल (Petrol) पंप व गजानन सर्विस सेंटर येथे घडला होता. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत.

शेगाव येथे कारमध्ये बसलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी पंप कर्मचाऱ्याकडून पेट्रोल टाकी फुल करून घेतली. दरम्यान, टाकी फुल झाल्यानंतर पैसे न देताच त्याने तेथून धूम ठोकली. त्यानंतर नांदुरा, खामगाव आणि दोन दिवसापूर्वी आंबेटाकळी येथील दोन पेट्रोल (Petrol) पंप, अशा विविध ठिकाणी असा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे कारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांना आजपर्यंत कुणीही ओळखलेले नाही. मात्र हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक असावेत आणि गुन्ह्यात ही कार वापरली जात असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांसंदर्भात आजपर्यंत जिल्ह्यात ४ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर अजूनही काही तक्रारी दाखल होणार असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पेट्रोल (Petrol) पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पूर्णतः भितीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना घडल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात होत आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. या चोरीच्या प्रकरणांची पोलिसांनी तातडीने दखल घेत या टोळीचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्मचारी करत आहेत.

Edited By- Satish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.