मावळातील कार्ला गड लवकरच समस्यांच्या विळख्यातून सुटणार : खा.अनिल देसाई

मावळ मधील कार्ला एकविरा गड आणि परिसरात मोठ्या समस्यांचा विळखा आहे. कार्ला गडावर हजारो भाविक भक्त महाराष्ट्र भरातून येत असतात.
मावळातील कार्ला गड लवकरच समस्यांच्या विळख्यातून सुटणार : खा.अनिल देसाई
मावळातील कार्ला गड लवकरच समस्यांच्या विळख्यातून सुटणार : खा.अनिल देसाईदिलीप कांबळे

मावळ : मावळ मधील कार्ला एकविरा गड आणि परिसरात मोठ्या समस्यांचा विळखा आहे. कार्ला गडावर हजारो भाविक भक्त महाराष्ट्र भरातून येत असतात. मात्र, गडावर कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. महिलांना पुरुषांना स्वच्छ्ता गृह पण नाही तर कचऱ्याची मोठी समस्या मोठी आहे.

हे देखील पहा :

याबाबत खासदार अनिल देसाई यांना विचारले असता कार्ला एकविरा गडासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच या सर्व कामांना सुरुवात होऊन कार्ला गडावरील सर्व समस्या सुटतील असे आश्वासन यानिमित्ताने खासदार अनिल देसाई यांनी आगरी कोळी बांधवाना दिले.

मावळातील कार्ला गड लवकरच समस्यांच्या विळख्यातून सुटणार : खा.अनिल देसाई
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video

यावेळी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर, मावळ चे खासदार श्रीरंग बारणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्ला गडाच्या पायथ्याशी आगरी समाज सेवा संस्थेच्या धर्मशाळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने खासदार अनिल देसाई, खासदार गजानन कीर्तिकर उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com