गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी, भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल
गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखलविजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. कोरोना संसर्गाची हि स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. Case Filed against Gopichand Padalkar

हे देखील पहा -

मात्र, सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमावल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 19 जुलै रोजी पार पडला होता.

या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्या प्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आमदार पडळकरांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल
जातपंचायतीकडून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

ऑनलाईन पध्दतीने देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता; तर कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर होते.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com