Pandharpur : तलवारीचा वार आईने झेलला हातावर, मुलाचा वाचला जीव पण...

संशयित आराेपींवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur Police
Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur PoliceSaam TV

पंढरपूर : खर्डी (Khardi) येथील एक महिलेने स्वत:च्या मुलाचा (son) जीव वाचविण्यासाठी तलवारीचा (sword) वार हातावर झेलला. या घटनेत तिच्या हाताचा पंजा तुटला असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी पाेलिसांनी (police) चार जणांवर गुन्हा दाखल केल्या माहिती पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली. (Pandharpur Crime News)

पंढरपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे. अनैतिक संबंधांमुळे झालेल्या वादातून एका महिलेवर तलवार हल्ला झाला आहे. यामध्ये महिलेचा पंजा तुटून पडला आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी महिला पुढे सरसावली. या महिलेने आपल्या लेकरावरील वार तिच्या हातावर झेलला. या हल्ल्यात महिलेच्या मुलाचा जीव वाचला. पण आईचा हात मनगटापासून वेगळा झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur Police
Pandharpur : सभापती, उपसभापतींसह दिग्गजांना धक्का; पंचायत समिती आरक्षण जाहीर

ही घटना पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात घडली. या घटनेत जयश्री विठ्ठल रणदिवे या जखमी झाल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रामदास सर्जेराव कांबळे याच्यासह सीताराम सर्जेराव कांबळे, हरिदास सर्जेराव कांबळे आणि इंदापूर येथील संतोष उकरंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur Police
पत्नीच्या डोक्यात मारला हाताेडा; पतीस अटक

या महिलेवर वार केल्यामुळे संशयितांना जमावाने बेदम मारहाण केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खर्डी येथील संतोष रणदिवे याच्या अनैतिक संबंधावरून गुरूवारी सकाळी रणदिवे आणि कांबळे कुटुंबात वाद झाला. यावेळी रामदास कांबळे याने आपल्या बरोबर कुर्‍हाड तर संतोष उकरंडे याने तलवार आणली होती. भांडणामध्ये रामदास याने तलवारीने संतोष रणदिवे याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जवळच उभी असलेली संतोषची आई जयश्री यांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या पुढे आपला हात घातला. रामदास कांबळे याने जोरदार वार केल्याने जयश्री यांच्या हाताचा पंजाच हता वेगळा झाला.

Edited By : Siddharth Latkar

Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur Police
Satara News : सातारकरांना जाब द्यावा लागेल : शिवेंद्रराजे; विचारांची उंची कधी वाढणार, सातारकरांना कुतुहल : उदयनराजे
Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur Police
Pandharpur : आषाढी यात्रेत विठ्ठलास पाच कोटी सत्तर लाखांची देणगी अर्पण
Pandharpur , Pandharpur Crime News , Mother, Son, Fighting , Pandharpur Police
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील माघारी नंतर नीरज चोप्रा झाला भावूक; देशवासियांना लिहिलं पत्र

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com