...म्हणून नातेवाईकांनी तिचं प्रेत चितेवरुन उतरवलं; तिघांवर गुन्हा दाखल

या घटनेमुळे गावकरी आणि मृत विवाहितेच्या नातेवाईकांत गाेंधळ उडाला हाेता.
Beed Crime News
Beed Crime NewsSaam TV

Beed Crime News : एका विवाहितेचा खून करून तिने आत्महत्य केल्याचा बनाव रचल्याने संबंधित विवाहितेच्या पतीसह सासू-सासर्‍यांविरोधात पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल आहे. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील कोळगाव येथे घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

कोळगाव येथील 28 वर्षीय विवाहितेचा नुकताच मृत्यू झाला हाेता. तिने आत्महत्या केल्याचे सांगितलं जात हाेते. परंतु तिच्या नातेवाईकांनी स्माशनभुमीत तसेच पाेलीस मुख्यालय येथे आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पाेलिसांनी कायदेशिर कारवाई करण्यास प्रारंभ केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी - प्रियंका भाऊसाहेब येडे (वय 28 रा. कोळगाव, ता. गेवराई) असं विवाहितेचे नाव आहे. प्रियंकाचा 15 सप्टेंबरला मृत्यु झाला होता. तिने आत्महत्या केल्याचे तिच्या माहेरच्या लोकांना पटत नव्हते. तिच्या माहेरच्या माणसांनी त्यावर विश्वास न ठेवता पाेलिसांत धाव घेतली. आमच्या मुलीचा खून झाल्याचे सांगून खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी पाेलिसांना केली.

Beed Crime News
ज्वेलर्सला फुटला घाम...,बिर्लांचा फाेन जाताच पाेलिसांच्या गाड्या सुटल्या सुसाट अन्...

प्राथमिक माहितीनूसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातील टाळाटाळ केली हाेती. मात्र नातेवाईकांच्या आक्रमकतेपुढे आणि काही अंशी माहिती प्राप्त झाल्यानंतर पाेलिसांनी हालचाली केल्या. दरम्यान मृत महिलेचे शवविच्छेदन स्वाराती रुग्णालयात करण्यात आलं. याप्रकरणाच गेवराई पोलीस ठाण्यात प्रियंकाच्या पतीसह सासू सासरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Beed Crime News
येत्या रविवारी 'कास पठार' ला जायचा प्लॅन केलाय ?थांबा ! ही बातमी वाचा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com