मराठा तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी बॅंक अधिका-यांवर गुन्हा दाखल
crime newsSaamTv

मराठा तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी बॅंक अधिका-यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर crime news : कोल्हापूरात मंजूर कर्जाची रक्कम न मिळाल्याने एका मराठा युवकाने आत्महत्या केली. या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकचे निरीक्षक आणि शाखाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

जय डवंग असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्ज मिळावे यासाठी कर्ज प्रकरण दाखल केले हाेते. त्यास मंजूरी मिळाली हाेती.

crime news
तसं कुणाला जमत नाही; उदयनराजेंनी केले मुख्यमंत्र्यांचे काैतुक

परंतु ते देण्यास विलंब केला जात हाेताे. टाळाटाळ केली जात हाेती. त्यामुळे निराश झालेल्या जयने आत्महत्या केली. त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. कळे पाेलिस ठाण्यात या प्रकरणी बँक निरीक्षक राजेंद्र बेलेकर तसेच शाखा अधिकारी नामदेव खोत यांच्यावर गुन्हा नाेंद झाला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com