पोलीस स्टेशनवर दगडफेक; 200 पेक्षा जास्त जणांविरुध्द गुन्हा दाखल

मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर दगड आणि लाठ्या काठ्या घेऊन अंदाधुंद देगडफेक केली. याप्रकरणी एकुण २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द दारव्हा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशनवर दगडफेक; 200 पेक्षा जास्त जणांविरुध्द गुन्हा दाखल
पोलीस स्टेशनवर दगडफेक; २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द गुन्हा दाखलसंजय राठोड

संजय राठोड

यवतमाळ : दारूच्या नशेत आप-आपसामध्ये सार्वजनिक ठिकाणी वाद करून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची वाहने अडवून लुटमार करित असल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून पोलीसांना मिळाली. यामध्ये पोलिसांना तिघांनी ताब्यात घेतले. परंतु ताब्यात घेतलेल्या एकाचा यादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर दगड आणि लाठ्या काठ्या घेऊन अंदाधुंद  देगडफेक केली. याप्रकरणी एकुण २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द दारव्हा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case has been registered against more than 200 people in a stone throwing on police station

लुटमारीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी रवाना होऊन तिघांना पोलीसांनी ताब्यात घेत ठाण्यात आणलं. मात्र ताब्यात घेतलेल्या पैकी शेख इरफान शेख शब्बीर यांच्या छातीमध्ये अचानक दुखत असल्याने त्याला उपजिल्हा रूग्णालयात नेलं असता डाॅक्टरांनी इरफान ला मृत्यू घोषीत केलं. Case has been registered against more than 200 people in a stone throwing on police station

मृतक इरफानची माहिती मिळताच यांच्या नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून गैर कायदेशीर २०० पेक्षा जास्त मंडळी जमवून पोलीस स्टेशन वर दगड आणि लाठ्या काठ्या घेऊन अंदाधुंद  देगडफेक केल्याने कर्तव्यावर हजर असलेल्या तीन पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना गंभीर दुखापत झाली.

पोलीस स्टेशनवर दगडफेक; २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द गुन्हा दाखल
दीपिका-प्रियांकाच्या पाठोपाठ हॉलीवूडच्या दिशेने आलिया भट्ट

त्यामुळे कलम ३२५, ३५३, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, १८८, २६९, २७० भादवी सहकलम ३ (ई) नुसार एकुण २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द दारव्हा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमुख आरोपीचे नाव जावेद खान, शोएब खान, शाहरूख खान, राजु खान, अयुब सरकार, शारिफ चाऊस, साहेब डाॅन, नवाब उर्फ विकी,  खाजा खान, रिजावान कैची, अरबाज खान, शाकीर शेख, अजर शेख, सोहेल मारी,  फिरोज शेखर यांच्या सह इतर २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द दारव्हा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com