विद्यार्थिनीला अश्लिल टोमणे! आयुर्वेद कॉलेजच्या डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहमदनगच्या संगमनेर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना पुन्हा सामोर आली
विद्यार्थिनीला अश्लिल टोमणे! आयुर्वेद कॉलेजच्या डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
विद्यार्थिनीला अश्लिल टोमणे! आयुर्वेद कॉलेजच्या डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखलSaam Tv

अहमदनगर : अहमदनगच्या संगमनेर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना पुन्हा सामोर आली आहे. संगमनेरातील एका आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात महिलेला लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारचे कृत्य केल्याचा ठपका ठेवीत तक्रार दाखल केली आहे.

हे देखिल पहा-

विद्यार्थिनीच्या तक्रारी नंतर संगमनेर शहर पोलिसांनी तातडीने डॉक्टर सराफ याच्या विरोधात विनयभंगासह आईपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. संगमनेर शहरानजीकच्या संगमनेर खुर्द शिवारात असलेल्या एका आयुर्वेद महाविद्यालयात मागील काही महिन्यांच्या दरम्यान रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सदरचा प्रकार होत होता. आरोपी डॉक्टर हा पीडित विद्यार्थिनीस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता.

विद्यार्थिनीला अश्लिल टोमणे! आयुर्वेद कॉलेजच्या डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
संभूखेड गावच्या सुपुत्राला राजस्थान मध्ये वीरमरण

याबाबत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील एका 26 वर्षीय तरुणीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात आईपीसी कलम ३५४,५०९,५०४ आणि ५०६ नुसार संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com