राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, कार्याध्यक्षासह 11 जणांवर गुन्हा

ncp solapur
ncp solapur

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे nationalist congress party नुकत्याच आयोजिलेल्या कार्यक्रमात काेविड 19 च्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा, नियमांचा आणि निकषांची पायमल्ली झाल्याने पाेलिसांनी राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्ष, शहर अध्यक्षांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केले आहे. (case-registered-11-ncp-karykarta-solapur-mim-bjp-jayant-patil-sml80)

सोलापुरातील ‘एका लॉन्स’ वर राष्ट्रवादी काँग्रेसनं ncp पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास खूप माेठी गर्दी जमली होती. कोरोना काळात राजकीय कार्यक्रम न घेण्याची सक्त ताकीद मुंबई उच्च न्यायालयाने दिली असताना आणि राज्य सरकारनेही त्यासाठी नियम कडक केले असताना त्याची अंमलबजावणी हाेत नाही हे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एमआयएम आणि भाजपातील नगरसेवकांच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

ncp solapur
सातारा : 29 बाधितांचा मृत्यू; महाबळेश्वरात एक रुग्ण आढळला

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भरत जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापुरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात कलम 143, 188, 269, 336 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com