'डॅडींवर आजोबांनी रिव्हाॅल्वर रोखली, माझी छेडछाड केली'

'डॅडींवर आजोबांनी रिव्हाॅल्वर रोखली, माझी छेडछाड केली'
crime

सातारा crime : आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तब्बल १९ वर्ष मनात ठेवून जावयावर पिस्तूल राेखण्याचा प्रकार साता-यात नुकताच घडला आहे. दरम्यान आपल्या वडिलांवर पिस्तुल राेखल्याचे पाहून मुलीने त्याचे माेबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यामुळे आजाेबांनी नातीस धक्काबुक्की केली.

crime
IPL 2021 : वॉशिंग्टन सुंदरला वगळले; RCB ने निवडलं या खेळाडूस

यावरुन नातीने आजाेबांवर विनयभंगाची तक्रार केली आहे. या तक्रारीत तिने संबंधितांनी रिव्हाॅल्वर राेखल्याचे म्हटले आहे. तसेच छेडछाड केली. त्यानूसार सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित आजाेबावर विनयभंगाची तक्रार दाखल नाेंद करण्यात आली आहे.

या घटनेतील आजाेबा हे एका शासकीय कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत असे पाेलिसांनी सांगितले. या घटनेची सातारा शहरासह कृष्णानगर भागात माेठ्या प्रमाणात चर्चा झाली. सातारा पाेलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सखाेल तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी तपासी अधिकारी म्हणून श्री. काेकरे यांची नियुक्ती केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com